मातृत्त्वाचा प्रवास हा निसर्गाचा सुंदर चमत्कार आहे, नऊ महिन्यांच्या वाटेवर एका नव्या जीवाचा सुखकर प्रवास आहे. गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर, पण तितकाच शारीरिक आणि मानसिक बदलांचा काळ आहे. या काळात शरीरातील इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन यांसारख्या हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात. त्यासोबत बाळाच्या आरोग्याची चिंता, प्रसूतीची भीती, स्वतःच्या शरीरातील बदल, नोकरी-घराची जबाबदारी आणि नातेसंबंधातील ताण यामुळे मानसिक चढ-उतार जाणवू शकतात. थोडी चिडचिड, भावनिक होणे, काळजी वाटणे किंवा कधीतरी रडू येणे हे काही प्रमाणात सामान्य असू शकते. मात्र सतत काही लक्षणं दिसली तर काळजी घ्यायला हवी.
वारंवार आणि तीव्र किंवा दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारी असतील म्हणजे त्यांचा परिणाम झोप, जेवण, स्वत:ची काळजी किंवा नातेसंबंधांवर होत असेल
तर दुर्लक्ष करू नये आणि त्वरित मांनसोंपचार तज्ञ कड़े दाखवावे.
गर्भावस्थेत मानसिक आजाराची लक्षणे दिसली म्हणजे औषधे घेणे धोकादायकच असते असे नाही. प्रत्येक रुग्णासाठी परिस्थितीनुसार मानसोपचार,काऊन्सिलिंग, लाइफस्टाइल मॉडिफिकेशन, किंवा आवश्यक असल्यास गर्भावस्थेत वापरता येणारी औषधे यांचा विचार केला जातो. यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ यांच्यात समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे.
आईचे मानसिक आरोग्य चांगले असणे हे आईसाठीच नव्हे तर आई-बाळाच्या नात्यासाठी आणि बाळाच्या भावनिक विकासासाठीही महत्त्वाचे आहे.
“गर्भावस्थेत भावनिक चढ-उतार होणे सामान्य असू शकते; पण त्रास सहन करणे हे उपचार नाही. घरच्यानींही गरोदर महिलेकडे नीट लक्ष द्यायला हवे. तिने काही सांगितले की लगेच सल्ले देत ते उडवून लावू नये.
उगाच टेंशन घेते, जास्त विचार करु नकोस असे म्हणून दुर्लक्ष करु नये.
गरोदरपणात मानसोपचारांची मदत घेणे हा कमीपणा नसून स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्याची आपली गरज आणि जबाबदारी आहे.
(डॉ स्नेहा मेहता मानसोपचारतज्ज्ञ असून ISTDP सायकोथेरपिस्ट आहेत.)