आपल्या घरातील आजीआजोबा किंवा वृद्ध व्यक्ती अचानक चिडचिड करायला लागतात, विसरभोळे होतात, एकाकी राहू लागतात किंवा एखाद्या लहान मुलासारखा हट्टीपणा करू लागतात. अनेकदा आपण "वय झालंय, दुसरं काय!" किंवा "म्हातारपणी स्वभाव बिघडतोच," असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण वृद्धांच्या या बदलत्या स्वभावामागे केवळ वयाचा परिणाम नसून अनेक गंभीर वैद्यकीय, शारीरिक आणि मानसिक कारणं असू शकतात.
वय वाढते तसे माणसाच्या शरीरात आणि मनात अनेक नैसर्गिक बदल होत असतात. अनेकदा आपण पाहतो की, घरातील वृद्ध व्यक्तींचा स्वभाव अचानक बदलतो; त्या अधिक हट्टी, चिडचिड्या, संशयी किंवा एकाकी बनतात. सामान्यतः आपण या बदलांना 'वयोमानानुसार स्वभाव बदलला' म्हणून दुर्लक्ष करतो. मात्र, त्यांचे हे वर्तन जाणूनबुजून नसून, त्यांच्या शरीरात व मेंदूत होणाऱ्या बदलांचा तो एक परिणाम असतो.
जेव्हा त्यांना गोष्टी आठवत नाहीत किंवा कानाने कमी ऐकू येते, तेव्हा त्यांच्या मनात भीती निर्माण होते आणि तीच भीती रागाच्या रूपात बाहेर पडते. अनेकदा व्हिटॅमिनची कमतरता, थायरॉईड किंवा औषधांचे दुष्परिणाम यांसारख्या वैद्यकीय कारणांवर योग्य उपचाराने मात करता येते. जर तुमच्या घरातील वृद्धांच्या स्वभावात अचानक मोठा बदल दिसून आला, तर ताबडतोब मानसोपचारतज्ज्ञांचा किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, वृद्धापकाळात त्यांना उपदेशाची नाही, तर तुमच्या प्रेमळ स्पर्शाची आणि योग्य वैद्यकीय काळजीची गरज असते. पण असं नेमकं का होतं ते समजून घेऊया.
१. मेंदूतील बदल आणि न्यूरोलॉजिकल आजार
वाढत्या वयानुसार मानवी मेंदूच्या रचनेत आणि कार्यक्षमतेत बदल होतात. काही विशिष्ट आजारांमुळे हे बदल वेगाने घडून येतात.
डिमेंशिया (Dementia) आणि अल्झायमर्स (Alzheimer's) : या आजारांमध्ये मेंदूतील पेशींचे नुकसान होते. सुरुवातीला रोजच्या साध्या गोष्टी विसरणे, नंतर नातेवाईकांना न ओळखणे, रस्ता विसरणे अशा समस्या उद्भवतात. जेव्हा रुग्णाला स्वतःला काही आठवत नाही, तेव्हा त्याच्या मनात प्रचंड भीती आणि गोंधळ निर्माण होतो. या भीतीतूनच ते अनेकदा संशयी किंवा आक्रमक बनतात.
२. मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर्सचे असंतुलन
आपल्या भावना, आनंद, राग आणि उत्साह नियंत्रित करण्यासाठी मेंदूत काही रसायने (Neurotransmitters) असतात.
३. ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता मंदावणे
जसजसे वय वाढते, तसतशी दृष्टी मंदावणे आणि कानाने कमी ऐकू येणे या समस्या सुरू होतात. संवादात अडथळे येतात. इतरांचे बोलणे नीट न ऐकू आल्यामुळे किंवा न दिसल्यामुळे ते चर्चेत सहभागी होऊ शकत नाहीत.
४. दीर्घकालीन शारीरिक आजार आणि वेदना
सतत होणारा शारीरिक त्रास माणसाच्या मानसिकतेवर थेट परिणाम करतो.
५. औषधांचे दुष्परिणाम (Side Effects of Medications)
वृद्धांना अनेक प्रकारची औषधे एकाच वेळी सुरू असतात. (Polypharmacy)काही रक्तदाबाची औषधे, झोपेच्या गोळ्या, ॲलर्जीवरील औषधे किंवा वेदनाशामक (Painkillers) गोळ्यांमुळे मानसिक गोंधळ, चक्कर येणे, स्मृतीभ्रंश होणे किंवा मूड स्विंग्स (Mood Swings) होणे असे दुष्परिणाम दिसतात.
अनेकदा दोन वेगळ्या औषधांची आपापसात प्रतिक्रिया (Drug Interaction) झाल्यामुळेही स्वभावात विचित्र बदल घडतात.
१. वृद्धांच्या बदलत्या वर्तनाला त्यांचा दोष न मानता, ती एक वैद्यकीय परिस्थिती आहे हे कुटुंबाने स्वीकारले पाहिजे.
२. संयम आणि ऐकून घेणे: त्यांच्यावर रागावण्याऐवजी किंवा वाद घालण्याऐवजी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या.
३. नियमित वैद्यकीय तपासणी: त्यांच्या स्वभावात अचानक मोठा बदल झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. अनेकदा व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता, थायरॉईड किंवा
४. युरिन इन्फेक्शन (UTI) मुळेही वृद्धांमध्ये अचानक गोंधळ आणि स्वभावबदल दिसून येतो.
५. डॉक्टरांकडून वेळोवेळी त्यांच्या औषधांची तपासणी करून घ्या, जेणेकरून अनावश्यक औषधे किंवा दुष्परिणाम टाळता येतील.
६. सकारात्मक वातावरण: त्यांना घरात महत्त्वाचे स्थान द्या. छोटी-मोठी कामे देऊन त्यांना व्यस्त ठेवा, जेणेकरून त्यांना आपण निरुपयोगी असल्याची भावना येणार नाही.
७. वृद्धापकाळ हा आयुष्याचा एक नाजूक टप्पा आहे. बदलणारा स्वभाव हा मदतीसाठी मारलेली हाक असू शकते. योग्य वैद्यकीय उपचार, कुटुंबाचे प्रेम आणि संयम यांच्या जोरावर वृद्धांचे उर्वरित आयुष्य आनंदी आणि सन्मानजनक बनवता येते.
(डॉ. बिस्वजीत जगताप मानसोपचारतज्ज्ञ असून डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये (MVPS नाशिक) प्राध्यापकही आहेत.)