किशोरवयीन मुलांमधील मानसिक आरोग्य
पौगंडावस्था हा शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. किशोरावस्था म्हणजे मेंदूच्या जलद विकासाचा काळ. हा काळ उत्साह, बदल आणि आव्हानांनी भरलेला असतो.
किशोरवयीन मुलांसाठी मानसिक आरोग्य विशेषतः नाजूक असते. हार्मोन्समधील बदलामुळे होणारे भावनिक चढ-उतार, शैक्षणिक दबाव, सोशल मीडियाचा प्रभाव आणि नातेसंबंधांतील गुंतागुंत यामुळे या वयात ताण, चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक समस्या उद्भवू शकतात.
जागतिक स्तरावर 10 ते 19 वयोगटातील सुमारे प्रत्येक 7 पैकी 1 किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी मानसिक आजारांनी प्रभावित होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आत्महत्या ही तरुणांमध्ये मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. भारतातील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की सुमारे 15% किशोरवयीन मुले मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत.
किशोरवयीन मुलांमधील मानसिक आजार
चिंता विकार
किशोरवयीन मुलांमध्ये चिंता विकार हा सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे.
लक्षणे:
सततची चिंता किंवा भीती
लक्ष केंद्रित करण्यात अडचण
चिडचिडेपणा
डोकेदुखी, पोटदुखी किंवा छातीत धडधड होणे
नैराश्य
नैराश्य म्हणजे सतत निराशेची भावना.
लक्षणे:
अपराधीपणाची भावना
छंद किंवा सामाजिक उपक्रमांमध्ये रस कमी होणे
वारंवार थकवा जाणवणे
कमी किंवा जास्त झोप येणे
भूक कमी किंवा जास्त लागणे
आत्महत्येचे विचार येणे किंवा स्वत:ला इजा पोहोचवण्याची प्रवृत्ती
अटेंशन-डेफिसिट/हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD)
एडीएचडी हा विकार प्रामुख्याने बालपणात सुरू होतो आणि पौगंडावस्थेतून प्रौढत्वापर्यंत चालू राहू शकतो.
लक्षणे:
कामावर किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येणे
अतिसक्रियता (स्थिर बसण्यात अडचण)
परिणाम:
एडीएचडीमुळे किशोरवयीन मुलांच्या शालेय जीवनावर, नातेसंबंधांवर आणि आत्मसन्मानावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.खाणे विकार
पौगंडावस्थेत शरीराच्या प्रतिमेबद्दलची चिंता ही मोठी समस्या ठरते.
“मी स्वत:च्या किंवा समाजाच्या नजरेत कसा दिसतो?” हा प्रश्न मुलांना महत्त्वाचा वाटू लागतो. वजन, उंची, केसांची शैली, कपडे याबद्दल चिंता वाढते.
यामुळे आत्मकेंद्रीपणा वाढतो आणि कधी कधी नैराश्य व खाण्याचे विकार निर्माण होऊ शकतात.प्रकार:
एनोरेक्सिया नर्वोसा: वजन वाढण्याची तीव्र भीती, ज्यामुळे अन्नाचे सेवन खूप कमी होते.
बुलिमिया नर्वोसा: खूप अन्न खाल्ल्यानंतर जबरदस्ती उलट्या करणे किंवा जास्त व्यायाम करणे.
परिणाम:
उपचार न केल्यास गंभीर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD)
मानसिक आघात किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम करू शकतो.
अपघात, छळ, गैरवर्तन अशा आघातजन्य घटना अनुभवल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर PTSD होऊ शकतो.लक्षणे:
घटनेबद्दल सतत आठवणी किंवा दुःस्वप्न येणे
त्या घटनेची आठवण करून देणाऱ्या ठिकाणे किंवा गोष्टी टाळणे
भावनिक असंवेदनशीलता
झोपेच्या समस्या
अचानक राग येणे
व्यसनाधीनता
काही किशोरवयीन मुले मानसिक समस्या, समवयस्कांचा दबाव किंवा कठीण भावनांशी सामना करण्यासाठी धूम्रपान, ड्रग्ज (गांजा, एम.डी.) आणि अल्कोहोलचा वापर करू लागतात.
या पदार्थांचा गैरवापर केल्याने त्याचे व्यसन लागते आणि त्याचा नकारात्मक परिणाम होतो:मासिक पाळीपूर्व सिंड्रोम (PMS)
मुलींमध्ये मासिक पाळी येण्याच्या १ ते २ आठवडे आधी काही मानसिक आणि शारीरिक लक्षणे दिसू शकतात.
मानसिक आरोग्य विकारांकडे दुर्लक्ष का केले जाते?
कलंक: मानसिक आजारांना अनेकदा कलंकित केले जाते. त्यामुळे किशोरांना त्याबद्दल बोलताना लाज किंवा संकोच वाटतो.
जागरूकतेचा अभाव: पालक, शिक्षक आणि स्वतः किशोरवयीन मुलांनाही मानसिक आजारांची लक्षणे ओळखता येत नाहीत.
गोंधळात टाकणारी लक्षणे: चिडचिडेपणा किंवा मूड बदल ही लक्षणे अनेकदा “सामान्य किशोरवयीन वर्तन” म्हणून दुर्लक्षित केली जातात.
किशोरांना दिला जाणारा आधार
मोकळा संवाद: मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे चर्चा करण्यास प्रोत्साहन द्या.
शिक्षण: स्वतःला आणि इतरांना मानसिक आरोग्याबद्दल शिक्षित करा, म्हणजे योग्य आधार देता येईल.
व्यावसायिक मदत: जर एखादा किशोर मानसिक आरोग्याशी झुंजताना दिसला, तर त्याला समुपदेशन किंवा आवश्यकतेनुसार औषधोपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करा.
निरोगी सवयी: पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे मानसिक आरोग्य सुधारते.
सोशल मीडिया नियंत्रण: सोशल मीडियामुळे चिंता, नैराश्य आणि शरीर प्रतिमेबाबत समस्या वाढू शकतात. त्यामुळे किशोरांना सोशल मीडियापासून वेळोवेळी ब्रेक घेण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि वापर मर्यादित ठेवा.
आधार: सातत्यपूर्ण पाठबळ, प्रोत्साहन आणि सुरक्षित वातावरण दिल्यास किशोरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो.
- किशोरवयात चढ-उतार होणे सामान्य आहे, पण चिंता, नैराश्य किंवा इतर मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
लवकर निदान, कौटुंबिक आधार आणि व्यावसायिक मदतीमुळे बहुतेक किशोर बरे होऊन निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगू शकतात.
किशोरवयात चढ-उतार होणे सामान्य आहे, पण चिंता, नैराश्य किंवा इतर मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
लवकर निदान, कौटुंबिक आधार आणि व्यावसायिक मदतीमुळे बहुतेक किशोर बरे होऊन निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगू शकतात.