BIPOLAR MOOD DISORDER (द्विध्रुवी विकार)
मानसिकदृष्ट्या निरोगी म्हणजे आपल्याला जीवनातील ताणतणावांचा सामना करण्यास इतरांशी चांगले संबंध राखण्यास आणि आपले ध्येय साध्य करण्यास मदत करते.
द्विध्रुवी विकार म्हणजे काय ?
* हा एक मानसिक आरोग्याचा विकार आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या मूड मध्ये तीव्र चढ-उतार होतात. (Mood Swings)
* यात व्यक्तीच्या मन:स्थितीत दोन टोक दिसतात –
१) उत्साही / आनंदी / उन्माद टप्पा(mania/hypomania)- खूप उर्जा झोप कमी अति बोलणे जास्त खर्च अति आत्मविश्वास किंवा धोका घेणारे वर्तन
२) उदासीन / नैराश्य टप्पा ( depression) – खूप दु:ख निराशा थकवा आत्महत्येचे विचार आवडी निवडी नष्ट होणे
हे दोन टप्पे कधी आठवडे तर कधी महिने टिकतात आणि आळीपाळीने देखील येऊ शकतात.
लक्षणे कशी ओळखावी ?
मॅनिया (mania) टप्पा –
* अतिहर्ष मन: स्थिती खूपच उत्साही आनंदी किंवा चिडचिडेपणा अत्याधिक उर्जा
* शारीरिक हालचाली जास्त प्रमाणात व विचित्र
* जास्त विनोद करणे छेद छाडीची भाषा किंवा कविता स्वरुपात बोलणे
* झोपेची गरज कमी वाटणे तरीही दिवस भर ताजे तवाने वाटणे
* खूप जास्त प्रमाणात बोलणे शब्दांवर दाब देवून बोलणे अतिघाईत व जलद बोलणे
* अवास्तव आत्मविश्वास
* खूप मोठे वेगवान व काल्पनिक विचार
* धोकादायक निर्णय ( पैश्यांची उधळपट्टी विनाकारण व अविचारी गुंतवणूक बेफिकीरपणे वाहन चालवणे )
* काहीवेळा या अवस्थेत भ्रम ( Hallucinations ) आणि संशय (Delusions ) सारखी लक्षणे दिसू शकतात.
डिप्रेशन टप्पा –
* सतत दुखी किंवा रिकामेपण जाणवणे
* थकवा आळस
* नियमित कामामध्ये रस व मन न लागणे
* उदासीन वाटणे, निराशा ,असहाय्य आणि नकारात्मक विचारांमुळे एकाग्रते मध्ये अडचण येणे
* आत्मविश्वासाची कमी
* भूक आणि झोप कमी होणे किंवा जास्त लागणे
* डोळे जड होणे शरीर दुखणे
* जीवन निरुपयोगी आहे असे वाटणे
* आत्महत्येचे विचार येणे व मरणाची इच्छा होणे
तर मग याचे कारणे काय ?
प्रामुख्याने
1) मेंदू मधील रासायनिक बदल कारणीभूत असतात (neurotransmitter मधील असंतुलन)
2) अनुवांशिक प्रवृत्ती – कौटुंबिक इतिहास , जवळच्या नातेवायिकाला बायपोलर आजार असल्यास हा आजार होण्याची शक्यता वाढते
3) तणावपूर्ण घटना – जवळच्या व्यक्तीचा मृत्यू ,एखादा मोठा अपघात
4) दीर्घकालीन ताण , झोपेचा अभाव
5) मादक पदार्थ /ड्रग्स व अल्कोहोल चा गैर वापर
6) पर्यावरणीय करणे – बालपणातील गैरप्रकार / छळ
उपचार काय आहेत ?
१) औषधे – मूड stabiliser, antidepressant, antipsychotic औषधे ( डॉक्टरांच्या सल्याशिवाय घेऊ नयेत )
२) समुपदेशन / कौन्सेलिंग व मानसोपचार – रुग्णाला व कुटुंबियांना विकाराबद्दल समजावणे ताण हाताळण्याचे तंत्र
३) संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (CBT ) कुटुंब केंद्रित थेरपी इंटर पर्सनल आणि सोशल रिदम थेरपी
४) जीवनशैलीत बदल-
. नियमित झोप
. संतुलित आहार
. व्यायाम
. मद्य व नशा टाळणे
. नियमित दिनचर्या
५) हॉस्पीटलायझेशन – जेव्हा रुग्ण स्वतःसाठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकतो त्या वेळेस रुग्णास रुग्णालयात भरती करणे आवश्यक असते.
गैरसमज दूर करूयात –
हा फक्त मूड बदलण्याचा स्वभाव आहे – नाही हा एक वैद्यकीय विकार आहे
औषधे आयुष्यभर घावी लागली तर व्यसन लागेल का ?
– औषधी व्यसन लावत नाहीत ती विकारावर नियंत्रण ठेवतात
– हे बरे होत नाही ? – योग्य औषधोपचार सायकोथेरपी आणि कुटुंबाचा पाठिबा मिळाल्यास रुग्ण सामान्य व यशस्वी जीवन जगू शकतो
शेवटी
द्वीधृवी विकार हा आजार लाज वाटण्यासारखा नाही. इतर शारीरिक आजारांप्रमाणे हा देखील एक मेंदूचा आजार आहे. वेळेवर निदान योग्य उपचार आणि कुटुंबाचा आधार मिळाल्यास रुग्ण आयुष्याचा आनंद पुन्हा घेऊ शकतो .
Dr.Leena Dhake